रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सप्तश्रृंगी नगरातील ४६ वर्षीय विवाहितेचा राहत्या घरात खून केल्याची धक्कादायक घटना दुपारी उघडकीला आली आहे. या घटनेमुळे रावेर शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, रावेर शहरातील सप्तश्रृंगी नगरात राहणारी सुनिता संजय महाजन (वय-४६) या विवाहितेचा लाकडी दांडा डोक्यात मारल्याने खून केल्याची धक्कादायक घटना गुरूवार ३ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास समोर आली. मयत विवाहितेचा मुलगा हा दुपारी कामावरून जेवनासाठी घरी आला तेव्हा घराला कुलूप होते. कूलूप उघडून पाहिले असता आईचा खून झाल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळाला शेजारच्या नागरीकांनी मोठी गर्दी केली. हा खून कोणी केला व का केला यासंदर्भात माहिती उपलब्ध झालेली नाही. खून झाल्याची माहिती रावेर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरिक्षक कैलास नागरे पोलिस उपनिरिक्षक विशाल सोनवणे,सचिन नवले,विजू जवरे आदी पोहचले आहेत.