Home क्राईम सार्वजनिक शौचालयात चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या

सार्वजनिक शौचालयात चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या


rape and muder mumbai

मुंबई (वृत्तसंस्था) जुहू परिसरातील एका सार्वजनिक शौचालयात नऊ वर्षांच्या मुलीवर पाशवी बलात्कार करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी ३५ वर्षीय देवेंद्र वड्डी याला अटक केली आहे. दरम्यान, आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केल्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

 

जुहू परिसरात राहणारी एक मुलगी मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा शोध सुरू असताना आज तीचा मृतदेह एका सार्वजनिक शौचालयात आढळून आला. वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यावर पाशवी बलात्कार झाल्याचे उघड झाले. दरम्यान, पोलिसांनी तपासचक्र फिरवत देवेंद्र वड्डी नामक आरोपीला अटक केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound