भुसावळात क्षुल्लक कारणावरून एकाचा खून

mayat tarun bhusawal

मृत विकास साबळे

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील पांडुरंग टॉकीज जवळ क्षुल्लक शाब्दीक वादातून तरूणाचा खून करण्यात आल्याची घटना आज रात्री घडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील पांडुरंग टॉकीज परिसरात असणार्‍या खान्देश हॉटेलमध्ये काउंटर वर दारू पित असतांना दोन जणांमध्ये शाब्दिक वाद झाला. यात कटरच्या ब्लेडने विकास साबळे यांच्या गळ्याच्या नसा कापल्यामुळे जागीच मयत झाल्याची घटना रात्री १०:३० वाजेच्या दरम्यान घडली आहे. खान्देश हॉटेलमध्ये परमिट रूम मध्ये निलेश ताकटे ( राहणार कॉसमॉस बँक जुना सातारा ) व विकास साबळे (वय ३६ राहणार गंगाराम प्लॉट) हा रेल्वे कर्मचारी दारू पित होता. येथे त्यांच्यामध्ये काही शाब्दिक वाद झाला. त्या कारणावरून हॉटेलच्या काऊंटरवर निलेश ताकटे याने धारदार कटरने विकास साबळे यांच्यावर हल्ला केला. यात गळ्याच्या नसा कापल्या गेल्याने तो जागीच मयत झाला असून आरोपी निलेश ताकटे याला बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी भेट देऊन झालेल्या घटनेची पाहणी केली.

Protected Content