मनपाचा गणेशोत्सव साधेपणाने ; पुरग्रस्तांना देणार मदत (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 09 02 at 5.03.01 PM

जळगाव, प्रतिनिधी | शहरतील मानाचा गणपती महापालिका कर्मचारी मंडळातर्फे श्रींची मोठ्या उत्सहात वाजत गाजत मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली.

दरवर्षी मानाचा गणपतीची भव्य स्वरुपात मनपा प्रशासकिय इमारतीत स्थापना करण्यात येतो . परंतु, या वर्षीचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. राज्यातील भीषण पूर परिस्थितीमुळे तसेच उत्सावासाठी जमा होणारी रक्कम ही पुरग्रस्त बांधवांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर सिमा भोळे यांनी कळविले आहे. महापालिकेत उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्या हस्ते श्रींची स्थापना करण्यात आली. ही मिरवणूक चन्दुलाला रसवंती फुले मार्केट येथून वाजत गाजत काढण्यात आली. मिरवणुकीत महापालिका अधिकार व कर्मचारी सहभागी झाले. होते. यामध्ये उत्कर्ष गुंटे, नगरसचिव सुनील गोराणे, सुभाष मराठे, सुनील भोळे, एच. एम. खान, व्ही. ओ. सोनवणी, चंद्रकांत वांद्रे, राजेंद्र पाटील, बाबा साळुखे, श्री. सोनगिरे, श्री. रंधे, बाळू भामरे, योगेश बोरोले, चंद्रकांत वांद्रे आदी सहभागी झाले होते. मूर्ती गाडीत चढविणे, उतरविणे तसेच मिरवणूकीचे नियोजन एच.एम. खान व साजिद अली यांनी पहिले. यानंतर उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली.

Protected Content