Home Cities भुसावळ नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून घटनेचा निषेध !

नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून घटनेचा निषेध !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपालिकेतील लेखापाल हर्षल रवींद्र वाणी यांना ठेकेदार रजत संजय बढे यांनी गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मारहाण केली आहे. या मारहाण केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी ७ फेब्रुवारी रोजी कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेसमोर काळ्या फिती लावून या घटनेचा जाहीर निषेध केला. आरोपीला अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

“भुसावळ नगरपालिकेला आलेला निधी परत का गेला, त्याची फाईल मला द्या,” यावरून वाद झाल्यानंतर रजत बढे यांनी हर्षल वाणी यांना मारहाण केली. या घटनेनंतर नगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काळ्या फिती लावून निदर्शने केली आणि आरोपीच्या अटकेची मागणी केली. आरोपीला अटक न झाल्यास भुसावळ नगर पालिका कर्मचारी आगामी काळात कामबंद आंदोलन करेल असा इशारा दिला आहे. यावेळी भुसावळ नगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.


Protected Content

Play sound