Home क्राईम माथेफिरूने प्रवाशी रिक्षा पेटविली; अडीच लाखांचे नुकसान

माथेफिरूने प्रवाशी रिक्षा पेटविली; अडीच लाखांचे नुकसान

0
माथेफिरूने प्रवाशी रिक्षा पेटविली; अडीच लाखांचे नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजीनगर मधील लाकूड पेठ येथे राहणाऱ्या एका रिक्षा चालकाची रिक्षा घरासमोर लावलेली असताना गुरुवारी ६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अजय राजेंद्र जगताप वय-३४, रा. लाकूडपेठ छत्रपती शिवाजीनगर जळगाव हा तरुण रिक्षा चालवत आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. त्यांच्याकडे राजू गणपत चौरे यांच्या मालकीची ऑटो रिक्षा क्रमांक एमएच १९ सीडब्ल्यू ६३४८) घरासमोर लावलेली असतांना गुरुवारी ६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरू व्यक्तीने नुकसान व्हावे या हेतूने सदरील प्रवाशी रिक्षा पेटवून दिली. या आगीत संपूर्ण पेक्षा जळून खाक झाली आहे. त्यामुळे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. यासंदर्भात रिक्षा चालक अजय जगताप यांनी जळगाव शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दुपारी १ वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल ओमप्रकाश सोनी हे करत आहे.