हैदराबाद वृत्तसंस्था । शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अंतिम फेरीतील सामन्यात विजय संपादन करून मुंबई इंडियन्सचे चौथ्यांदा आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तथापि, चेन्नईच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्यामुळे मुंबईने २० षटकांमध्ये ८ गडी गमवत १४९ धावा केल्या. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह मुंबईच्या बहुतांश फलंदाजांची निराश केले. मुंबईकडून किरॉन पोलार्डने सर्वाधिक ४१ धावा केल्या. त्या खालोखाल क्विंटन डी कॉकने २९ धावा काढल्या. यामुळे चेन्नईला १५० धावांचे आवाहन मिळाले.
चेन्नईच्या शेन वॉटसनने जोरदार फलंदाजी केली. पण वॉटसन धावचित झाल्याने सामन्यात रंगत आली. चेन्नईला विजयासाठी शेवटच्या चेंडूत दोन धावांची गरज होतील. मात्र, मलिंगाने शार्दुल ठाकूरला पायचित करून आपल्या संघाला चौथ्यांना आयपीएल जिंकवून दिला. मुंबईकडून मलिंगा आधी महागडा ठरला तरी त्याने निर्णायक क्षणाला जोरदार गोलंदाजी केली. तर बुमराह आणि चहर यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीने चेन्नईच्या फलंदाजांना बांधून ठेवत आपल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली.