मोहाली वृत्तसंस्था । किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने आज मुंबई इंडियन्स संघाचा तब्बल आठ गडी राखून दारूण पराभ केला.
मुंबई इंडियन्सची सलामीची जोडी क्विंटन डी-कॉक आणि रोहित शर्मा यांनी झोकात सुरूवात केली. क्विंटन डी-कॉकने ६० धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला रोहित शर्माने चांगली साथ दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. मात्र नंतर सूर्यकुमार यादव, युवराज सिंह, कायरन पोलार्ड लवकरच परतले. पांड्या बंधूनी फटकेबाजी करत मुंबईला १७६ धावांपर्यंत मजल मारुन दिली. पंजाबकडून मुरगन आश्विन, मोहम्मद शमी आणि विल्जोएन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्यांना अँड्रू टायने १ बळी घेत साथ दिली. पंजाबच्या संघातील गेल आणि राहुल जोडीने ५३ धावांची भागीदारी केली. ख्रिस गेल बाद झाल्यानंतरही लोकेश राहुलने आधी मयांक अग्रवाल आणि नंतर डेव्हिड मिलरच्या साथीने विजय संपादन केला. राहुलने नाबाद ७१ धावा केल्या. मुंबईकडून कृणाल पांड्याने २ बळी घेतले.