जळगाव प्रतिनिधी । धमकी देवून पिडीत मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधमास 14 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने आज सुनावली. आरोपी हा पीडीत मुलीचा सख्खा मामा असून गणेश पोपट खवले वय-24 रा. रा. म्हसला, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद असे आरोपीचे नाव आहे.
पिडीतेच्या वडीलांचे निधन झाल्यानंतर शेती कामात सहकार्य व्हावे यासाठी पिडीत मुलीच्या आईने आरोपीस त्यांच्या गावी भोरटेक, ता. भडगांव येथे बोलवले. त्यावेळेस पिडीत मुलगी वय वर्षे १४ ही इयत्ता ८ वि. च्या वर्गात शिकत होती. त्यावेळेस आरोपीने तुला व तुझे कुटूबियांना मारुन टाकेल अशी धमकी देवून पिडीत मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याने पिडीत मुलीच्या पोटात दुखु लागल्यामुळे पिडीतेला चाळीसगाव येथे तपासणी केली असता, पिडीत मुलगी की २६ ते २८ आठवडयाची गरोदर असल्याचे डॉक्टरांना निष्पन्न झाले.
त्यानंतर पिडीतेला तिच्या आई व काका, काक यांनी विश्वासात घेवून विचारणा केला असता, पिडीतेने आरोपीने तिच्यावर वारंवार केलेल्या लैंगिक अत्याचाराबाबत हकीकत सांगितली. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने भडगांव पोलीस स्टेशनला दिलेल्या तकारीवरुन आरोपी विरुध्द ग.र.नं. ६८/२०१८ नुसार भा.द.वि. कलम ३७६, ५०६ आणि बालकांचे लैगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम कलम ३, ४, ५ व ६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्हयाचे कामी तपास अधिकारी सहा.पो.निरीक्षक, रविंद्र जाधव यांनी गुन्हयाचा तपास काम करुन भडगांव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात कामकाज झाले. सरकारपक्षातर्फे पिडीतेची आई, पिडीत बालिका, पिडीता व तिचे नवजात बाळ आणि आरोपी यांची वैदयकीय तपासणी व डी.एन.ए.नमुने घेणारे डॉक्टर्स, डी.एन.ए. तज्ञ, इत्यादी असे एकण १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारपक्षातर्फे सहा. सरकारी वकील श्री. प्रदीप एम, महाजन यांनी काम पाहीले, में, न्यायालयाने सरकारपक्षाचा पुरावा व सरकारी वकीलांचा प्रभावी यक्तीवाद ग्राहय धरुन आरोपी गणेश पोपट खवले यास दोषी ठरविले.
अशी सुनावली शिक्षा
भादवि कलम ३७६ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास, रु.५,०००/- दंड, दंड न भरल्यास ६ महीन्याची साधी कैद, भादवि कलम ५०६ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास, रु.१,०००/- दंड न भरल्यास १ महीन्याची साधी कैद, बालकांचे लैगिक अपराधांपासुन संरक्षण अधिनियम कलम ६ अन्वये १४ वर्षे सश्रम कारावास, रु.५,०००/- दंड, दंड न भरल्यास ६ महीन्याची साधी कैद, सदर खटल्याच्या कामी भडगांव पोलीस स्टेशनचे केस वॉच समाधान पाटील आणि पैरवी अधिकारी अनिल सपकाळे यांचे सहकार्य लाभले.