मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर मतदार संघातील रखडलेल्या पुनर्वसन संदर्भात गावातील प्रमूख पदाधिकारी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक यांची आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी आढावा बैठक घेण्यात आली.
मुक्ताईनगर मतदार संघातील रखडलेल्या पुनर्वसन संदर्भात मंगळवारी पुनर्वसन मंत्र्यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले.
विविध गावातील पुनर्वसन संदर्भातील समस्या, अडचणी यावर सखोल चर्चा करून तसे प्रस्ताव तयार करून त्या अनुषंगाने बैठकीसाठी पूर्व तयारी करण्यात आली.
यावेळी आमदार चंद्रकात पाटील यांनी गाव निहाय पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांचे विविध विषय नमूद करून घेतले.
जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जलसंपदा अधिकारी यांच्याशी त्या त्या गावातील समस्या व अडचणी संदर्भात भ्रमण ध्वनी वरून चर्चा केली.
बैठकीत तांदलवाडी, मांगलवाडी, आंदलवाडी, सुलवाडी, पुरी गोलवाडा, शिंगाडी, सुलवाडी,कांडवेल, निंबोल , ऐनपुर , उचंदा, मेंढोलदे, मेळसांगवे, पंचाने, शेमळदे, बेलसवाडी, भोकरी, धामनदे, नरवेल, अंतूर्ली आदी गावातील रखडलेल्या पुनर्वसन व नागरी सुविधा यावर चर्चा करण्यात आली.
मुक्ताईनगर शहरातील रखडलेल्या चौथ्या टप्प्यातील पुनर्वसन व तिसऱ्या टप्प्यातील अनेक भूखंड वाटपात अनेक नागरिक यांचेवर अन्याय झाल्याने त्यांच्या ही समस्ये बाबत चर्चा होत त्या अडचणी नमूद करण्यात आल्या.