मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर-बर्हाणपूर महामार्गावर दोन दुचाकींची समोरा-समोर जोरदार धडक झाल्यामुळे दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील अंतुर्ली ते पातोंडी दरम्यान महामार्गावर एमपी ६८ एमडी-५००६ या दुचाकीस्वाराने रॉंग साईडने भरधाव वेगाने दुचाकी चालवत समोरून येणार्या एमपी १२ एमजे-५११७ क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात समोरच्या दुचाकीवरील योगेश ज्ञानेश्वर बाविस्कर व गणेश पंडित सैंगमिरे ( रा. नाचणखेडा, जिल्हा बर्हाणपूर ) या दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात विकास सिरकारे आणि अन्य एक महिला देखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. समोरच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर एमपी ६८ एमडी-५००६ या क्रमांकाच्या दुचाकीवरील स्वाराने अपघात स्थळावरून पलायन केले.
दरम्यान, या संदर्भात नितीन प्रकाश बाविस्कर ( रा. नाचणखेडा, जिल्हा बर्हाणपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलीस स्थानकात एमपी ६८ एमडी-५००६ या क्रमांकाच्या दुचाकी स्वाराच्या विरोधात भादंवि कलम ३०४ (अ); २७९, ३३७, ३३८, ४२७, १३४ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय प्रदीप शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रघुनाथ पवार हे करीत आहेत.