मुक्ताईनगर, पंकज कपले । येथील नगरपंचायतीमधील राजकारण निर्णायक वळणावर आले असून सत्ताधारी सहा नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. यामुळे येथील राजकारणात भूकंप होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. येथील नगराध्यक्षा नजमा तडवी यांच्यासह सत्ताधारी गटातील नगरसेवक हे खडसे गटाचे समर्थक आहेत. https://livetrends.new मात्र अलीकडच्या काळात सत्ताधारी गटात कुरबुरी सुरू झाल्या. यातच दोन दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या कामांना बहुमताने मंजुरी देण्यात आल्याने राजकीय धुरिणांच्या भुवया उंचावल्या होत्या. याप्रसंगी नगराध्यक्षांसह सहा नगरसेवकांनी शिवसेनेला साथ दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले होते.
या पार्श्वभूमिवर, आज मुक्ताईनगर नगरपंचायतीतील सहा नगरसेवक हे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. https://livetrends.new याप्रसंगी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचीही उपस्थिती राहणार आहे. यामुळे येथील राजकारणाची सूत्रे पूर्णपणे बदलणार असल्याने चर्चेला एकच उधाण आलेले आहे.