मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील बस स्थानकासमोर असलेल्या गतिरोधकांवर ट्रॅक्टर आदळून झालेल्या अपघातात, गाळण (ता.पाचोरा) येथील १७ वर्षीय तरुण ठार झाला.
याबाबत वृत्त असे की, रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास एम. एच. १९ बी. जी. ४५०८ या क्रमांकाचे ट्रॅक्टर मुक्ताईनगर शहरातील बसस्थानकासमोरून जामनेरकडे जात होते. बसस्थानकासमोरील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर जोरात आदळले. त्यामुळे ट्रॅक्टरवर बसलेला नयन मूलचंद राठोड (रा. गाळण ता. पाचोरा ) हा तरुण रस्त्यावर कोसळून जागीच ठार झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक बीबीसिंग मदनसिंग राठोड (रा.मुंदखेडा, ता.जामनेर ) याच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.