मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे विनापरवानगी पुतळा बसवला गेल्यानंतर उद्भवलेल्या वादात जमावाने केलेल्या दगडफेकीत १ पोलीस कर्मचारी जखमी झाला . त्याच्यावर जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे
मोहसीन शेख असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले
निमखेडी येथे अज्ञात लोकांनी रात्री महापुरूषाचा पुतळा स्थापीत केल्याचा प्रकार आज उघडकीस आला असून पोलिसांनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याचे वृत्त आहे.
याबाबत वृत्त असे की, मुक्ताईनगर-बोदवड मार्गावर असणार्या निमखेडी खुर्द या गावात रात्रीच्या सुमारात अज्ञात लोकांनी महापुरूषाचा पुतळा स्थापीत केला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी सकाळीच घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी संबंधीत पुतळा काढण्याचे काम सुरू केल्यानंतर काही काळ तणाव पसरला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आता परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर आली आहे.