मुक्ताईनगर प्रतिनिधी । केळी पीकावरील सीएमव्ही विषाणूचा झालेला प्रादूर्भाव व विम्याबाबत आ. चंद्रकांत पाटील यांची कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्यासोबत चर्चा करून याचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आ. चंद्रकांत पाटील यांनी केळी पीक विमा व सी.एम.व्ही. कुकुंबर व्हायरसमुळे झालेले नुकसान यासंदर्भात कृषी मंत्री यांच्याशी चर्चा केली. मुक्ताईनगर, रावेर , बोदवड , सावदा यासह संपूर्ण मतदारसंघात केळी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर्षी सी.एम.व्ही. कुकुंबर या व्हायरसमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
यासंदर्भात आज विधानसभेत कृषी मंत्री दादा भुसे व व कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याशी चर्चा करून शेतकर्यांना योग्य ती मदत कशा पद्धतीने करता येईल या संदर्भात आ. चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन सखोल चर्चा केली आहे. मुक्ताईनगर मतदारसंघात केळी हे पीक मोठ्या प्रमाणात आहे. तसेच केळी पिकविमा निकषांवर चर्चा झाली असल्याचे आ. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.