पोलिसांवर दगडफेक करणारे नऊ जण अटकेत

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे विना परवाना बसविलेला पुतळा पोलीस प्रशासन हटवत असतांना काही जणांनी दगडफेक केल्याच्या घटनेत गावातील ५७ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे काल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसण्यावरून वादंग निर्माण झाले होते. घटनास्थळी पोलिस पोहोचताच पोलिसांवर जोरदार दगडफेक करण्यात आली होती . यात दोन पोलीस जखमी झाले होते.

दरम्यान, दगडफेक करणार्‍या नऊ जणांवर रात्री मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान कायदा कलम ३५३,३३२,३३३,३२४,१४१,१४३ तसेच १४७ व १४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दीपक डहाके, गजानन डहाके, अतुल डहाके, मंगेश मराठे, देवेंद्र डहाके, कैलास डहाके, अरविंद लोमटे, मंगल करदळे आदींचा समावेश आहे. तर, याच प्रकरणात ५७ जणांवर जमाबंदी च्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून १३५ नुसार ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयितांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक निलेश साळुंके व पोलीस कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.

Protected Content