मोठे पाऊल : मुक्ताईनगरातील एमआयडीसीच्या भूसंपादनाला मंजुरी

मुक्ताईनगर-पंकज कपले | तालुक्यासाठी वरदान ठरण्याची शक्यता असणार्‍या औद्योगीक वसाहतीचा मार्ग आता मोकळा झाला असून पहिल्या टप्प्यातील १०० एकर जमीनीच्या भूसंपादनाला आज मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यात औद्योगीक वसाहत उभारण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. यात 450 एकर इतक्या जागेवर एमआयडीसी होणार असून याला आधीच मान्यता मिळाली आहे. दरम्यान, मान्यता मिळाल्यानंतर याच्या प्रत्यक्ष कामातील सर्वात मोठा आणि महत्वाचा टप्पा हा अर्थातच भूसंपादनाचा होता. भूसंपादनाच्या नंतरच्या याच्या कामाला खर्‍या अर्थाने गत येणार होती. या अनुषंगाने आज आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने मंत्रालयात बैठक घेण्यात आली.

या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह उद्योग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

Protected Content