मुक्ताईनगर प्रतिनिधी | तालुक्यातील अवैध धंद्यांवर बर्यापैकी चाप आला असतांना मात्र सट्टा अव्याहतपणे सुरू झाला असून त्या ‘नंबर दोन’ वाल्यांना नेमके कुणाचे अभय ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
या संदर्भात वृत्त असे की, तालुक्यातील अवैध व्यावसायिकांवर सातत्याने कारवाई होत असल्याने याला आळा बसल्याचे दिसून येत आहे. मात्र खत्री गल्लीत सुरू असलेल्या सट्टा पेढीवर आजवर कोणतीही फारशी कठोर कारवाई न करण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. एखाद दिवशी काही किरकोळ कारवाई झाल्यास मनाची समजूत म्हणून एखाद दिवस बंद ठेवला जातो परंतु लगेच नवा भिडू नवा राज प्रमाने खात्री गल्ली चालू होतं आहे. नुकताच असाच प्रकार घडला आणि लगेच रात्री चालू झाला व्यवसाय जोरात असल्यामुळे दररोज लाखो रुपयाची उलाढाल होत असते. विशेष म्हणजे या भागात सट्टा लावणारे व घेणारे यापैकी कोणीही मास्क चा वापर करत नाही. मुख्य चौकात सहज कोणाचीही नजर पडेल अशा ठिकाणी येथील अवैध धंदा राजरोसपणे सुरू आहे. पोलिस कारवाई करतात परंतु ती थातूर-मातूर असते .लागलीच त्या ठिकाणची परिस्थिती जैसे थेच आहे. याकडे सर्वांचे सोयिस्करपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी प्रशासनाने आवाहन केलेला जनता कर्फ्यु असो की लॉकडाऊन किंवा नुकतेच विकेंड लॉकडाऊन चे निर्बंध शहरातील सर्वच छोटे ,मोठे दुकानदार , व्यापारी तसेच नागरिक पूर्णतः आवाहनानुसार सहभागी होत असतात. परंतु याला अपवाद असतो खत्री गल्लीचा. खरं तर, येथील अतिक्रमण काढण्यात आले होते ते पुन्हा बसले यावेळेस बसलेच नाही तर पारंपरिक सट्याने कात टाकून येथे ऑनलाईन सट्टा देखील सुरू झालेला आहे. आणि हे सर्व भर चौकात सुरू आहे. सर्वसामान्य लोकांना कायद्याचा बडगा दाखवला जातो मग याना का नाही यात काही साटेलोटे असा प्रकार आहे का असल्यास ही बाब गुलदस्त्यातच आहे असे नागरिक चर्चा करत आहे
सध्या या गल्लीतील सट्टा , ऑनलाईन सट्टा व चक्री चा खेळ या अवैध धंद्यांच्या दुकानावर मात्र गर्दी असूनही तिला हटकले जात नाही की कुठली कारवाई होत नाही का ? तसे तर सदरील अवैध सट्टा चालक पोलीस गाडी चौकात आली की थोडा वेळ इतर ठिकाणी सट्टा घेतला जातो. पोलीस निघून गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याच ठिकाणी सट्टा सुरू होतो. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सट्टा पेढीवर कारवाई करायची असेल तर त्या व्यावसायिकांना आधीच माहिती दिली जाते. यानंतर कागदोपत्री कारवाई करण्यात येते. मात्र सट्टा किंग हा नेहमीच मोकाट राहत असल्याचे दिसून येते.
मुक्ताईनगरात सट्टयाचा सुळसुळाट झाला असून अनेक अल्पवयीन मुले देखील याला बळी पडत आहेत. यात लावलेल्या सट्टयाच्या कित्येक पटीने पैसे मिळत असल्याचे आमीष पाहून मुले याच्या अधीन झाल्याचे भयानक चित्र यातून उभे राहिले आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी सट्टा किंगवर कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे.