मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रौढ असाक्षरांना साक्षर करण्याच्या उद्दात हेतूने केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय मेळावा माननीय अंकितकुमार साहेब ( मुख्यकार्यकारी अधिकारी,जळगाव) यांच्या अध्यक्षतेखाली दि.१७ डिसेंबर रोजी नवोदय विद्यालय,भुसावळ येथे आयोजित करण्यात आला होता.प्रसंगी राज्य व जिल्हास्तरावरील शिक्षण विभागातील विविध अधिकारी वर्ग उपस्थित होते. मेळाव्यात जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके सहभागी झाले होते.
मेळाव्यात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत मुक्ताईनगर तालुक्याने द्वितीय क्रमांक पटकावला.तसेच प्रौढ असाक्षरांच्या शिक्षणास सुलभ होईल असे विविध शैक्षणिक साहित्यांचे स्टॉल लावून मुक्ताईनगर तालुक्यांने प्रभावी सादरीकरण केले. मुख्यकार्यकारी अधिकारी अंकित यांनी मुक्ताईनगर तालुक्याचे विशेष कौतुक केले.
सदरील असाक्षर जिल्हास्तरीय मेळाव्या प्रसंगी मुक्ताईनगर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री.मदन मोरे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी संजय ठोसर, केंद्रप्रमुख धनलाल भोई सर, केंद्रप्रमुख शांताराम तायडे यांचे मार्गदर्शन लाभले. सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केलेल्या पथनाट्यात दिनेश शिर्के, अतुल लोढे, संदीप सोनवणे, प्रमोद दुट्टे, सोमनाथ गोंडगिरे,सुनील बडगुजर,सतीश पवार, शत्रुघ्न भोई, तुषार चौधरी, विकी मोहोळ, राजेश तायडे, अजय सदांशिव, वैभव भुसारी, चित्रा तायडे, स्वाती बडगुजर, मिरा भोंबे (स्वयंसेवक), कमल भोंबे(असाक्षर प्रतिनिधी) इत्यादी शिक्षक सहभागी झाले होते.