मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सावदा, बोदवड आणि मुक्ताईनगर नगरपालिका हद्दीत अल्पसंख्यांक बहुल नागरिक क्षेत्र विकास कार्यक्रम या योजनेअंतर्गत अडीच कोटी रुपयांची विविध विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारामुळे अल्पसंख्यांक बहुल नागरिक क्षेत्र विकास कार्यक्रम या योजनेअंतर्गत मुक्ताईनगर संघातील सावदा, मुक्ताईनगर व बोदवड नगरपालिका क्षेत्रातील मुस्लिम बहुल विविध वार्डातील विविध कामांना मंजूरी मिळाली आहे. यासंदर्भात शासन निर्णय , अल्पसंख्यांक विभाग, क्र. नाक्षेवि-२०२२/प्र. क्र.१३७/का-९ मुंबई दि.२ डिसेंबर २०२२ अन्वये परिपत्रक जाहीर झाले झाले आहे.
याच्या अंतर्गत खालील प्रमाणे विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.
१)सावदा नगरपरिषद हद्दीत अल्पसंख्याक वस्तीमध्ये विविध विकास कामे करणे ता रावेर रु ८० लक्ष
२) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत अल्पसंख्यांक वस्तीमध्ये विविध विकास कामे करणे.रु ९० लक्ष
३)बोदवड नगरपंचायत हद्दीत अल्पसंख्यांक वस्तीमध्ये विविध विकास कामे करणे रु ८० लक्ष