मोक्का लागण्याच्या भितीने तर गिरीशभाऊंना कोरोना झाला नाही ना ? : खडसेंना पडला प्रश्‍न

मुक्ताईनगर प्रतिनिधी | ”मला कोरोना झाला असतांना संशय व्यक्त करणारे आमदार गिरीश महाजन यांना आता मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू असल्याने तर कोरोना झाला नाही ना ?” असा प्रश्‍न माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला आहे. या माध्यमातून त्यांनी महाजनांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

माजी मंत्री तथा विद्यमान आमदार गिरीश महाजन यांना आज कोरोना झाला. सकाळी याबाबतची माहिती त्यांनी जाहीर करून आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आता यावरूनच महाजनांचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यांना टोला मारला आहे.

आज पत्रकारांनी एकनाथराव खडसे यांना याबाबत विचारणा केली. यावर खडसे म्हणाले की, आता गिरीश महाजन यांना कोरोना झाल्याची बातमी समोर आली आहे. खरं तर, मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याने त्या भीतीपोटी गिरीश महाजन यांना दुसर्‍यांदा कोरोनाची लागण झाली नाही ना ? असा प्रश्‍न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे, तसेच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आहे, गिरीश भाऊ लवकर बरे व्हावे. त्यांची प्रकृती, स्वास्थ्य चांगले राहावे. त्यांची समाजाला आणि महाराष्ट्राला गरज आहे, त्यामुळे मी त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहे, असेही ते म्हणाले आहेत.

याआधी आ. गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांच्या कोरोनाबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. ईडीच्या चौकशीचे समन्स आल्यावरच त्यांना कसा काय कोरोना होतो ? असा प्रश्‍न देखील त्यांनी उपस्थित केला होता. यानंतर आज त्यांना दुसर्‍यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर खडसेंनी या आरोपांची सव्याज परतफेड केल्याचे मानले जात आहे.

Protected Content