सीएम चषक स्पर्धेत मुक्ताईनगर विधानसभा उत्तर महाराष्ट्रात प्रथम


भुसावळ प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार घेण्यात आलेल्या सीएम चषक स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातून मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राने अव्वल क्रमांक मिळवला आहे.

ग्रामिण व शहरी भागातील युवक युवती यांच्या मधील कला गुणांना वाव मिळावा त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी संपुर्ण राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सीएम चषकाचे विधानसभा ,जिल्हा ,राज्य स्तरावर आयोजन करण्यात आले होते. याच्या अंतर्गत मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा, उडान १०० मीटर धावणे, मुद्रा योजना ४०० मीटर धावणे, शेतकरी सन्मान कबड्डी योजना, इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धा, मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धा, खो खो स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुर्ण विधानसभा क्षेत्रातून सुमारे ६५८८५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यातील विजयी संघ, स्पर्धक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी महसुल मंत्री आ एकनाथराव खडसे ,खा रक्षाताई खडसे यांच्या सही असलेले प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे.

दरम्यान, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातून सहभागी स्पर्धकांची ६५८८५ हि संख्या संपुर्ण उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा क्षेत्रातून उच्चांकी ठरली आहे. त्याबद्दल मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय अंतिम बक्षिस वितरण सोहळ्यात मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे सीएम चषक अभियान संयोजक संदिप देशमुख यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजप युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा खा. पुनमताई महाजन, खा. रक्षाताई खडसे आदी उपस्थित होते

सीएम चषकच्या या यशस्वी आयोजनाबद्दल अभियान संयोजक संदिप देशमुख यांचे माजी मंत्री आ एकनाथराव खडसे, खा रक्षाताई खडसे, जिल्हा बँक अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणीताई खडसे खेवलकर, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान संयोजक डॉ राजेंद्र फडके , जि प उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी जि प अध्यक्ष अशोक कांडेलकर, बाजार समिति सभापती निवृत्ती पाटील ,भाजप जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, कैलास चौधरी ,चिटणीस राजू माळी, भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश ढोले, सह क्षेत्र प्रमुख शिवाजी पाटील, तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर, भागवत टिकारे यांनी अभिनंदन केले आहे.

Add Comment

Protected Content