हतनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले : सतर्कतेचा इशारा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरणाचे सर्वच्या सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

जून महिन्यात समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे तापी नदीच्या पात्रात पाणी नव्हते. आधी पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने हतनूर धरणात आवक झाली. यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून तापी नदीच्या वरील बाजूस जोरदार पाऊस होत असल्यामुळे धरणातील पाणी साठा वाढला आहे. आज सकाळीच धरणाचे २२ दरवाजे उघडण्यात आले होते.

दरम्यान, वरील बाजूला पाऊस पडत असल्याने आज सायंकाळी धरणाचे सर्वच्या सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे सर्व दरवाजे पाच मीटर इतक्या प्रमाणात उघडण्यात आले असून यामुळे नदी पात्रात सध्या १४१०८८ क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आलेली आहे.

Protected Content