Home Uncategorized राष्ट्रवादी सांस्कृतीक सेल तालुकाध्यक्षपदी अजय तळेले

राष्ट्रवादी सांस्कृतीक सेल तालुकाध्यक्षपदी अजय तळेले

0
54

मुक्ताईनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सांस्कृतीक सेलच्या तालुकाध्यक्षपदी अजय तळेले महाराज यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व नवनवीन पदाधिकार्‍यांना पदे देण्यात येत आहेत. त्यानुसार सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षपदी अजय महाराज तळेले यांची निवड करण्यात आली आहेे. आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माननीय शरद चंद्रजी पवार यांचे हात बळकट करण्यासाठी तालुक्यातील गावा गावात शहरात जाऊन त्यांचे विचार पोहोचून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चा विस्तार करणार आहोत अशी प्रतिक्रिया अजय महाराज तळेले यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष यु. डी. पाटील यांनी त्यांची नियुक्ती केली.

अजय महाराज तळेले यांच्या नियुक्तीमुळे त्यांचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिष्टचिंतन केले आहे.


Protected Content

Play sound