हरिनामाच्या जयघोषात मुक्ताबाईचा ७२५ वा अंतर्धान सोहळा उत्साहात संपन्न (व्हिडीओ)

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील तापी तीरावर असलेल्या संत मुक्ताबाई समाधीस्थळावर हरिनामाच्या जयघोषात मुक्ताबाईचा ७२५ वा अंतर्धान सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

एक वर्षापासून सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता –

संत मुक्ताईच्या ७२५ व्या अंतर्धान सोहळ्यासाठी मुक्ताबाईच्या मंदिरामध्ये एक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता. आज बुधवार दि.२५ मे रोजी नामदास महाराजांचे कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली. या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी असंख्य भक्तगण उपस्थित होते.

विविध ठिकाणाहून संतांच्या पादुका मुक्ताईनगरात दाखल –

या सोहळ्यासाठी अमरावती आपेगाव येथून रुक्मिणीच्या पादुका, पंढरपूर होऊन पांडुरंगाच्या पादुका, त्र्यबकेश्वर होऊन निवृत्तीनाथांच्या पादुका या ठिकाणी दाखल झाल्या आहेत.

टाळ, मृदुंगाच्या तालावर भाविक दंग –

हा अंतर्धान सोहळा अनुभवण्यासाठी आणि दर्शनासाठी मुक्ताई मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. टाळ, मृदुंगाच्या तालावर भाविक कीर्तनात तल्लीन झाले. तालावर ठेका धरत भाविकांनी फुगड्यांचा फेर धरत भक्तिरसाचा आनंद घेतला.

व्हिडीओ लिंक :
https://fb.watch/ddX0MyCJV5/

Protected Content