मुकेश सपकाळे खून प्रकरण : पाच संशयितांना चार दिवसाची पोलीस कोठडी (व्हिडीओ)

nayalay

जळगाव (प्रतिनिधी)। मुकेश सपकाळे खून प्रकरणात अटकेत असलेल्या सहा आरोपींपैकी पाच जणांना काल पुण्यातून ताब्यात घेतले होते. त्यांना आज जिल्हा सत्र न्यायालयात 4 वाजता हजर केले असता न्यायालयाने 5 जूलैपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

न्यायालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त
खून झाल्यानंतर महाविद्यालय आणि आसोदा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर मुकेशच्या मित्रांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी संशयित पाच आरोपींना आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नातेवाईकांसह मित्र परिवारांची गर्दी
मयत मुकेश सपकाळेचे नातेवाईक आणि मित्र परिवार यांची जिल्हा न्यायालयात एकच गर्दी केली होती. तत्पूर्वी सकाळी 10 वाजेच्या सुमारास चार संशयित आरोपींची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात हजर करण्यापूर्वीच कागदपत्रांची जुळवाजुळव रामानंदनगर पोलिस स्थानकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलिस कर्मचारी करत होते.

चारही आरोपींना पोलीस कोठडी
आज दुपारी चार वाजेच्या सुमारास चारही संशयित आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाच्या आठवे कोर्टात न्या. श्री डी बी साठे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सहाही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आले. हत्यार जप्त करण्यासाठी आणि उर्वरित आरोपी ताब्यात घेण्यासाठी पाचही आरोपीना 8 दिवसाची पोलीस कोठडी रामानंदनगर पोलिस स्थानकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी न्यायालयाकडे मागितली. त्यावर न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. फिर्यादीतर्फे सरकारी वकील ॲड.भागवत पाटील तर आरोपी मयूर माळी याच्यातर्फे ॲड.केदार भुसारी यांनी काम पाहिले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2181097905332567/

Protected Content