जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिकेच्या कचऱ्याच्या घंटागाडीवरुन चालकाची दुसऱ्या वार्डात बदली केल्याच्या रागातून त्याने मुकादमला कानशिलात लगावत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, महापालिकेच्या कचऱ्याच्या घंटागाडीवर गणेश सुरेश बाविस्कर वय २८ हा चालक म्हणून कामाला आहेत. दुसऱ्या वार्डात बदली केल्याच्या रागातून गणेश बाविस्कर याने शनिवार, २३ एप्रिल रोजी साडेसात वाजेच्या सुमारास आंबेडकर नगरात महापालिकेचे मुकादम शेख रफिक शेख मेहमूद वय ५५ रा. काट्याफाईल, जळगाव यांना गालावर चापट मारली. व शिवीगाळ करत जीवे मारण्याच धमकी दिली. अशी तक्रार मुकादम शेख रफिक यांनी शनिपेठ पोलिसात दिली असून त्यावरुन चालक गणेश बाविस्कर याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय निकम हे करीत आहेत.