चोपडा प्रतिनिधी । येथील विद्या प्रसारक मंडळ चहार्डी संचलित, भाऊसो शामराव शिवराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर संस्थेच्या हीरक महोत्सव वर्षानिमित्त आयोजित तालुकास्तरीय गीत गायन स्पर्धेत तालुक्यातून अनेक शाळांच्या विद्यार्थींनी सहभागी झाले होते. त्यापैकी विवेकानंद विद्यालयची विद्यार्थिंनी मुग्धा शहा तृतीय क्रमांक पटकावला आहे.
मुग्धा शहाला विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांची प्रेरणा व कलाशिक्षक राकेश विसपुते यांचे मार्गदर्शन लाभले. तिला मयुरी बागुल हिची हार्मोनियमची साथ लाभली. इयत्ता पाचवीचे विद्यार्थ्यांनी आर्या जोशी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे प्रमुख पाहुणे बिडगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक पठार, स्पर्धा आयोजक संस्थेचे पदाधिकारी व परीक्षक म्हणून पंकज विद्यालयाचे योगेश चौधरी व महिला मंडळ विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक दत्तात्रय धनगर यांनी काम पाहिले. मुग्धाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन यांच्यासह सर्व कार्यकारी मंडळ व विश्वस्त मंडळ शिक्षकवृंद, पालकवृंद, व विद्यार्थी यांनी अभिनंदन करत तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.