एरंडोल शहरात म्युकरमायकोसिस व पोस्ट कोव्हीड रोगनिदान व मार्गदर्शन शिबीर

एरंडोल, प्रतिनिधी  ।   तालुका मेडिकल असोसिएशन , सुखकर्ता फाउंडेशन  ह्या स्वयंसेवी संस्था व  तालुका वैद्यकीय अधिकारी ह्यांच्या पुढाकारातून आणि प्रांताधिकारी विनय गोसावी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर जाखीटे भवन येथे घेण्यात आले. 

 

जळगाव येथील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ् व ह्याविषयी सर्वप्रथम वाचा फोडणारे डॉ. धर्मेंद्र पाटील ह्यांनी म्युकरमायकोसिसच्या आजाराबद्दल , लक्षणाबद्दल सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. म्युकरमायकोसिसचे लवकर निदान होणेकामी रुग्णाबरोबरच डॉक्टरांनी हि सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. डॉ . फरहाज बोहरी ह्यांनी म्युकरमायकोसिसचा आजार संसर्गजन्य नसून तो प्रत्येक कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना होत नसल्यामुळे घाबरण्याची गरज नसून ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे.  ज्यांना अनियंत्रतीत मधुमेह आहे , ज्यांनी स्टेरॉईडसह इतर जीवरक्षक औंषधी घेतली आहे अश्यांनी विशेष दक्षता घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

पॅथॉलॉजिस्ट डॉ . राहुल मयूर ह्यांनी  पोस्ट कोव्हीड रुग्णांमध्ये अर्थात कोरोनासंसर्गानंतर सकारात्मक मानसिकतेची गरज असल्याची व त्यासाठी कुटुंब व मित्र ह्यांच्यासोबतीची , योग , प्राणायम व व आवडत्या गोष्टी , छंद जोपासण्याची आवश्यकता व्यक्त केली. डॉ. स्नेहल पाटील ह्यांनी पोस्टकोव्हीड काळात थकवा येणे , दम लागणे , काही रुग्णांना प्राणवायूची गरज पडणे , निद्रानाश अश्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असलं तरी ह्या समस्या काही काळानंतर योग्य त्या वैद्यकीय सल्ल्यानंतर दूर होणार असल्यामुळे घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचे मत व्यक्त केले.  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . फिरोज शेख ह्यांनी म्युकरमायोसीसला रोखण्यासाठी आरोग्ययंत्रणा योग्य त्या उपाययोजना लवकरात लवकर कार्यान्वित करत असून महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार ह्या आजारावर केले जात असून आता म्युकरमायकोसिस हा आजार साथ रोग म्हणून घोषित करण्यात आल्याचे नमूद केले.  प्रांताधिकारी  विनय गोसावी ह्यांनी म्युकरमायकोसिस संदर्भातील  हे रोगनिदान व मार्गदर्शनशिबीर एरंडोल सारख्या शहरात प्रथमतः आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले व  एकाच ठिकाणी  ह्याविषयातील सर्व विशेषतज्ञ् ह्यांनी केलेले सादरीकरण व रुग्णाची तपासणी करण्याचा हा प्रकल्प उत्तर महाराष्ट्रासाठी पथदर्शी व आदर्शवत  ठरेल अशी आशा व्यक्त केली .डॉ . प्रियांका वाघ , डॉ . धर्मेंद्र पाटील ह्यांनी संशयित रुग्णाची तपासणी केली . एरंडोल परिक्षेत्रातील २७ पेक्षा जास्त कोरोनापश्चात महिला पुरुष रुग्णांनी तपासणी करून घेतली .

 

एरंडोल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक तुषार देवरे  ,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चोधरी,  एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश चोधरी , माजी उपनगराध्यक्ष शालिक गायकवाड , माजी उपनगराध्यक्ष संजय चौधरी , माजी नगरसेवक जगदीश ठाकूर , नितीन ठक्कर , केशव ठाकूर , सुनिल चौधरी ,   प्रमोद पाटील , निलेश मानुधने ,  डॉ. एस . टी . पाटील ,  राखी काबरा ,  उज्वला राठी , डॉ .शेखर पाटील , डॉ . राहुल पाटील ह्यांचा समावेश होता

एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुधीर काबरा ह्यांनी ह्या.

सचिव डॉ . राहुल वाघ  यांनी आभार मानले . सूत्रसंचालन सुखकर्ता फाउंडेशनचे डॉ . नरेंद्र ठाकूर ह्यांनी केले .  यशस्वीतेसाठी   सुखकर्ता फाउंडेशनचे . शेखर बुंदेले ,  प्रसन्न परदेशी व सहकारी मित्रानी कामकाज पहिले.

Protected Content