चाळीसगाव प्रतिनिधी । महावितरण कार्यालयात मोबाईल चार्जिंगला लावण्याच्या कारणावरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील जुना पॉवर हॉऊस चौधरी वाडा येथील महाविरण कंपनीचे कार्यालय आहे. २३ जुन रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास साहिल प्रेमराज गुजराथी रा. जुना पॉवर हाऊसरोड चौधरीवाडा चाळीसगाव हा महावितरण कार्यालयात मोबाइल चार्जिंगला लावला. दरम्यान महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता अखिलेश पुरूषोत्तम नंदनवार रा. चाळीसगाव यांनी मोबाईल लावण्यास मनाई केली. याचा राग आल्याने साहिती गुजराथी, दिपक जगदीश गोयर, तुषार भुऱ्या खरटमल सर्व रा. चाळीसगाव यांना राग आल्याने त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. दरम्यान तू कार्यालयाच्या बाहेर तर निघ तुला दाखवतो असे सांगून धमकी दिली. याप्रकरणी सहाय्यक अभियंता नंदनवार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ पंकज पाटील करीत आहे.