महावितरण कनिष्ठ अभियंताची ग्राहकांशी असभ्य वर्तन ; चौकशीची मागणी

फैजपूर प्रतिनिधी । येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता ग्राहकांशी असभ्य वर्तन करतात, अशी तक्रार ग्राहक आहे. अशा ग्राहकांशी असभ्य वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागाने चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौधरी यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे लेखी तक्रारव्दारे केली आहे.

या तक्रारीत संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात झालेल्या आय पी डी एस 2 या योजनेतील कामांची चौकशीची मागणी करण्यात आली आहेत त्याच सोबत संबंधित जेई यांच्याविरोधात एकूण आठ तक्रारीचे मुद्दे सादर करून वरिष्ठांचे ही लक्ष वेधण्यात आले आहे या संपूर्ण भोंगळ कारभार या विषयी दिनांक 22 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. यातील प्रत्येक मुद्द्याच्या चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली .असून याविषयी संबंधित कनिष्ठ अभियंत्याला  आपले म्हणणे तात्काळ लेखी स्वरुपात सादर न केल्यास कारवाईचे संकेत दिले गेल्याचे समजते एकूण आठ मुद्द्यांपैकी मुद्दा क्रमांक एक संबंधित अधिकारी कडून येणाऱ्या नागरिकांची ज्या उर्मट भाषेचा वापर केला जातो 

2) वीज वितरण कंपनीकडून संबंधित अधिकाऱ्याला7875889976 या क्रमांकाचा मोबाईल तक्रार निवारणासाठी फोन केल्यास उडवा उडवीची उत्तरे देऊन लँडलाईन नंबर वरती फोन करा असे सांगितले जाते या विषयाच्या रेकॉर्डिंग वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे व काही पत्रकार बांधवांना सुद्धा याचा प्रत्यय आला आहे.

3) एखाद्या नागरीकांचे घर बांधकाम पूर्ण होऊन कम्प्लिशन सर्टिफिकेट देऊन सुद्धा अशा नागरिकांना नाहक फिरवले जाऊन त्यांचे कमर्शियल मीटर चे घरगुती वापरासाठीचे मिटर करून देण्यास टाळाटाळ का होते.

4) शहरातील स्ट्रीट लाईट सकाळी7.30 वाजेपर्यंत सुरू असते दररोज किमान दीड तासाचा भुर्दंड हा नगरपरिषदेला अर्थातच सामान्य नागरिकांच्या खि ज्याला सहन करावा लागत आहे या विषयाकडे संबंधित अधिकारी चे स्पष्ट दुर्लक्ष असल्याचे दिसते.

5) गेल्या दोन महिन्यापासून लाईट जाण्याचे व लाईट ट्रिप होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे हा टेक्निकली फॉल्ट न शोध ता येणारांना फक्त नियमांचा पाढा वाचून दाखविला जातो. 

6) सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे कोरोनाच्या काळात व आतासुद्धा सक्तीने विज बिल वसुली केली जात असताना50% बिल ग्राहकांनी भरण्याचे सांगितल्यास100% बिल भरण्याची आडमुठी भूमिका घेऊन असे सांगितले जाते की वरिष्ठ अधिकारी व्ही सी चालू असताना आमची आई बहीण काढतात मग खरंच अशा भाषेचा वापर व्ही सी मध्ये वरिष्ठ अधिकारी करतात का याची सुद्धा चौकशी व्हावी का संबंधित अधिकारी नागरिकांची दिशाभूल करत आहे याची सुद्धा चौकशी करण्यात यावी त्याचप्रमाणे महिन्याकाठी होणारे एनर्जी ऑडिट ची तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होऊन यात दोषी आढळणाऱ्या धिकार्‍यांवर कडक कार्यवाही करावी,  अशा विविध समस्यांचा जणू पाढाच वरिष्ठां समोर मांडून या संपूर्ण विषयाची चौकशी होऊन संबंधित जे ई यांच्यावर क डक कार्यवाही करून यांची या ठिकाणाहून तात्काळ बदली करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौधरी यांनी करून या निवेदनाच्या प्रती वरिष्ठ जळगाव सर्कल ऑफिस मुख्य अभियंता नाशिक झोन महाशय ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य महाशय एम एस आर टी कार्यालय मुंबई त्यासोबत मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश गड मुंबई व आ.शिरीष चौधरी यांच्या कडे ई-मेल द्वारे पाठविल्याचे कळविण्यात आले आहे.

 

Protected Content