चोपडा येथील सौ.शशिकला विसपुते निबंध स्पर्धेत प्रथम

chopada nibandh spardha

चोपडा, प्रतिनिधी | नाशिक येथील जिल्हा अहिर सुवर्णकार समाज हरिओम सांस्कृतिक संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय निंबध स्पर्धेत येथील सौ. शशिकला राजकुमार विसपुते यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. निबधांचा विषय ‘वधू-वर मेळाव्याची सामाजिक गरज’ हा होता.

 

त्यासाठी अहिर सुवर्णकार समाजाची शान प्रसिध्द नाट्य व सिने कलाकार मृणालीनी दुसानीस यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला. समाजाचा २२वा वधू-वर पालक मेळावा काल (दि.२९) सकाळी नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Protected Content