एमपीएससी परीक्षा पुढे ढकला : विनायक मेटे

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दि. ११ ऑक्टोबर, १ नोव्हेंबर व २२ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या  परीक्षा पुढे ढकलावी व उमेदवारांची वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

 मराठा विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत विनायक मेटे यांनी सरकारवर टीका केली.  मेटे म्हणाले, कोरोनाच्या सुरवातीच्या काळात  परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. परंतु आता कोरोना वाढलेला असतानाही परिक्षा घेत आहेत. आयोगामार्फत परीक्षा पुढे ढकलण्याऐवजी महाराष्ट्र सरकार मराठा समाजाच्या मुलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. मंत्रालयातील काही लोकांनी हा कट शिजवलेला असून त्यांच्या मुळेच ही परीक्षा होत असल्याचा आरोप ही मेटे यांनी यावेळी केली.

महाराष्ट्र सरकार आणि एमपीएससी यांना शेवटचा इशारा देत असून त्यांनी परीक्षा पुढे ढकलली नाही तर ९ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करू. येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्वरित निर्णय घ्या. आमचीच काही लोक बाहुले बनून परीक्षा घेण्याबाबत संमती दाखवत आहेत. या विषयावर कोणीही राजकारण करू नये, अशी अपेक्षा ही मेटे यांनी यावेळी केली.

Protected Content