जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे.” हे वाक्य अनेकांच्या हृदयावर कोरणारे वरिष्ठ उद्घोषक सतीश पप्पू सेवानिवृत्त होत आहे. कृषी विज्ञान केंद्र. ममुराबाद येथील कार्यक्रमात खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते यांचा हृदय सत्कार करण्यात आला.
आज मंगळवार, दि. ३१ मे रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात खासदार उन्मेश पाटील म्हणाले की, “अगदी लहानपणापासूनचे आकाशवाणी आणि सतीश पप्पू हे नाते आमच्या कायम स्मरणात राहणार आहे. त्यांनी ‘खासदार आपल्या भेटीला’ या सदरात माझी आकाशवाणीवर घेतलेली मुलाखत नेहमीच स्मरणात राहील. वेगळ्या धाटणीच्या मधूर आवाजाची देणं लाभलेले एक लोभस, विनम्र व्यक्तिमत्व म्हणून सतिश सरांचा उल्लेख करावा लागेल त्यांनी आकाशवाणी लोकाभिमुख होण्यासाठी व्यक्तिशः सतत परिश्रम घेतले. सार्वजनिक जीवनात नव्यानं सूत्रसंचालकाच्या भूमिकेत त्यांचा आवाज पुन्हा पुन्हा ऐकायला मिळेल.” ही अपेक्षा व्यक्त करीत त्यांना सतीश पप्पू यांना पुढील निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावर ‘मेरी आवाज ही मेरी पहचान है असं म्हणत सतिश पप्पू यांनी आभार मानले.