राज तिलक की करो तयारी : रक्षाताई खडसे होणार केंद्रीय मंत्री

मुक्ताईनगर-पंकज कपले | रावेरच्या नवनिर्वाचीत खासदार रक्षाताई खडसे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून त्या सायंकाळी आपल्या पदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त येताच परिसरात आनंदाची लहर उसळली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, नुकत्याच लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात रावेर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रक्षाताई निखील खडसे यांनी विजयाची हॅटट्रीक साजरी केली होती. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना धुळ चारून हा विजय साकार केला होता.

लागोपाठ तिसर्‍यांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्याने रक्षाताई खडसे यांना केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळेल अशी चर्चा सुरू झाली होती. विशेष करून त्या विजयाची हॅटट्रीक करणार्‍या राज्यातील एकमेव महिला नेत्या ठरल्या असून ओबीसी समुदायाच्या असल्याने त्यांच्या नावाला पसंती होती. यातच मंत्रीपदाच्या दावेदार असणार्‍या डॉ. भारती पवार, डॉ. हिना गावित, नवनीत राणा आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे रक्षाताई खडसे यांचा दावा अजून मजबूत झाला.

या पार्श्‍वभूमिवर, रक्षाताई खडसे यांना संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. अखेर रविवारी सकाळी पंतप्रधान कार्यालयातून रक्षाताई खडसे यांना कॉल करून मंत्रीपदाबाबत माहिती देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या आपल्या पदाची आज शपथ घेणार असल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. या माध्यमातून प्रदीर्घ काळानंतर जळगाव जिल्ह्यास मंत्रीपदाची संधी मिळणार आहे.

Protected Content