*मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा ।* दिल्ली येथे जात असतांना प्रवासादरम्यान मेरठच्या किथौध भागात एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे. दोन लोकांनी हल्ला करत त्यांच्या ताफ्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणात वापरलेली शस्त्र सापडली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याप्रसंगी ओवेसी यांनी व्यक्त होत, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मोदी सरकारने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी. या घटनेमागे कुणाचा हात होता, याचा तपास करावा. एका खासदारावर उघडपणे गोळीबार होणं, कसं शक्य आहे,” असा सवाल केला.
ओवेसी म्हणाले, “किथौध, मेरठ येथील एका मतदान कार्यक्रमानंतर दिल्लीला निघालो असतांना छाजरसी टोल प्लाझाजवळ तीन चार लोकं होते. त्यापैकी दोन लोकांनी माझ्या वाहनावर सुमारे तीन ते चार गोळ्या झाडल्या. त्यात माझ्या वाहनाचे टायर पंक्चर झाले त्यानंतर मी तेथून दुसऱ्या वाहनाने निघालो ” असं त्यांनी सांगितलं.