जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र सरकारने पारित केलेला “हिट अँड रन” या नवीन कायद्यांतर्गत लागू केलेली नियमावली तातडीने रद्द करावी, या मागणीसाठी शहरातील क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटनेच्या वतीने मंगळवार २ जानेवारी रोजी आकाशवाणी चौकात जोरदार निदर्शने व आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आले.
केंद्र सरकारने “हीट अँड रन” या नवीन कायद्याला लागू करण्यात आले आहे. दरम्यान हा कायदा वाहन चालकांसाठी त्रासदायक आहे. यात असलेल्या जाचक अटींमुळे भविष्यात वाहन चालवणे मुश्किलीचे होणार आहे. या कायद्यामुळे सर्व वाहनचालक हे रस्त्यावर येणार आहे. त्यामुळे त्यांचे भविष्या अंधारात आहे. दरम्यान केंद्र सरकारने चालकांच्या हिताचा कोणताही निर्णय न घेता हा कायदा पास केलेला आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात देशभरात तीव्र विरोध केला जात आहे. या अनुषंगाने जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात मंगळवारी २ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता शहरातील क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटनेच्या वतीने आकाशवाणी चौकात रास्ता रोको करत जोरदार निदर्शने करण्यात आले. हा कायदा तातडीने रद्द करावा, अशी मागणी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.