चिन्या मृत्यु प्रकरण : दोन कारागृह रक्षकांची न्यायालयात नोंदविली साक्ष

 

जळगाव प्रतिनिधी । कारागृहातील बंदीवान चिन्या ऊर्फ रविंद्र जगताप याचा जेलर व त्याच्या साथीदारांनी मारहाणीत मृत्यु केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षिदार मनोज जाधव आणि सचिन कोरके यांनी आज जिल्हा न्यायालयात खटल्याची साक्ष दिली आहे.

नाशिक मध्यवर्ती कारागृहातून चार बंदी साक्षी नोंदविण्यासाठी येणार होते. परंतु गार्ड उपलब्ध न झाल्याने येऊ शकले नाहीत.  जळगाव शहरातील शहर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यामध्ये रवींद्र उर्फ चिन्या जगताप हा जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये होता. दरम्यान 11 सप्टेंबर रोजी चिन्या जगतापचा संशयास्पद मृत्यू झाला. कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, जितेंद्र माळी यांच्यासह संबंधित दोषींवर खुनाचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी चिन्याची पत्नी मीना जगताप हिने केल्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरु आहे. आज या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षिदार मनोज जाधव व सचिन कोरके यांची साक्ष नोंदविण्यात आली. तसेच चिन्या जगताप याच्या मृत्यू झाल्यावेळी तडकाफडकी जळगाव जिल्हा कारागृहातून नाशिक कारागृहात वर्ग करण्यात आलेले बंदी व चिन्या जगताप या मृत्यू प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षिदार अनिल चौधरी, नागेश पिंगळे, दिगंबर कोळी व गौरव पाटील यांची आज साक्षी नोंदविण्यात येणार होती. परंतु नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जळगाव न्यायालयात आणण्यासाठी गार्ड उपलब्ध न झाल्याने येऊ शकले नाही. नाशिक मध्यवर्ती कारागृहातील  तुरुंगाधिकारी प्रशांत पाटील हे उपस्थित होते.

Protected Content