नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांचे आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ढाकेवाडी येथील स्थानिक नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. दरम्यान आज मंगळवारी संतप्त नागरिकांनी लाठी शाळेजवळील महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

जळगाव शहरातील डाकेवाडी येथील राहत असलेल्या स्थानिक रहिवाशांना गेल्या अनेक महिन्यांपासून गटारी, रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छता आदी सुविधांबाबत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात जळगाव महानगरपालिका प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देण्यात आले, परंतु महानगरपालिका प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या लाठी शाळेजवळील कार्यालयात आंदोलन केले.

यावेळी महानगरपालिकेकचे अधिकारी, ठेकेदार आणि नगरसेवकांची संतप्त नागरिकांनी चांगलीच कान उघडणी केल्याचे पाहायला मिळाले.

Protected Content