एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । एरंडोल येथील हिमालय पेट्रोलियम येथे आज सकाळी 11 वाजता भाजपा सरकारच्या पेट्रोल, डिझेल व सिलिंडरच्या दरवाढीच्या विरोधात एरंडोल येथील तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला या प्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय महाजन, डॉ. फरहाज बोहरी, प्रा. आर.एस.पाटील यांनी केंद्र सरकारने इंधनाचे भाववाढ केल्याने मनोगतात निषेध केला व नागरिकांनी पुन्हा गोरगरीब जनतेचे म्हणजे काँग्रेसचे सरकार निवडून द्यावे असे आवाहन केले.
याप्रसंगी शहर काँग्रेस चे अध्यक्ष संजय भदाणे, संजय कालाल, रईस शेख, कलीम पठाण, डॉ. शेख, इसाक शेख उत्राण, मदन भावसार, मुजमिल शेख कसोदा यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.