पाचोरा, प्रतिनिधी | पाचोरा ते जामनेर रस्त्यावर मालखेड्याजवळ दोघा मोटार सायकलींची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एक जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज (दि.१८) घडली. जखमींना येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशल हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण हा जामनेर येथील रहिवासी राकेश लोणारी असून तो जागीच ठार झाला आहे. त्याच्यासोबत असलेले बालु वाढे आणि दीपक जाधव जखमी झाले आहेत तर दुसर्या मोटारसायकलवरील तरुण सोयगांव येथील विलास राऊत व हरीष सोहनी हे आहेत. या चौघांवर येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच जखमींना हॉस्पिटलमध्ये भरती करतांना कॉग्रेस आयचे आरोग्य सेवा सेल अध्यक्ष सचिन सोमवंशी, सामाजिक कार्यकर्ते निंभोरी येथील प्रदीप पाटील उपस्थित होते.
यावेळी जखमींवर डॉ.संदीप इंगळे, डॉ.प्रवीण देशमुख, डॉ.सागर गरुड, डॉ.सुदर्शन पाटील, डॉ.विजय पाटील आदींसह हॉस्पिटलच्या टीमने तत्काळ जखमींवर उपचार सुरू केले. यावेळी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. घटनास्थळी तत्काळ विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अॅम्ब्युलन्सने येथे आणण्यात आले. यावेळी शेंदुर्णीचे भैया सुर्वे, शरद बारी, योगेश बारी, गणेश कोळी, महेंद्र काळे, पतींग पाटील आदींनी सहकार्य केले.