जळगाव, प्रतिनिधी । उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन व एस.टी. वर्कशॉप येथे अनेक वर्षापासून मोटार वाहन कर, पर्यावरण कर थकीत असलेली व तपासणीत दोषी आढळलेल्या वाहनांचा लिलाव 6 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली आहे.
सदरची बिनधनी, बेवारस व दावा न केलेल्या स्क्रॅप वाहनांचा लिलाव महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये नोंदणी प्राधिकारी यांना असलेल्या अधिकारात ही जाहिर नोटीस देण्यात येत आहे. या वाहन मालक, ताबेदार, वित्तदाता यांनी थकीत कर व तडजोड शुल्क भरुन वाहने सोडवून नेण्यासाठी अवगत करुनही ते कर व दंड भरण्यासाठी व वाहन सोडविण्यासाठी कार्यालयात हजर झालेले नाहीत. त्याचप्रमाणे वायुवेग पथकांनी वेळोवेळी अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना नोंदणीकृत पत्त्यावर नोंदणीकृत पोच देय डाकेने नोटीसा पाठविण्यात आलेल्या आहेत.
मोटार वाहन कायदा 1988 मधील तरतुदीनुसार वाहनमालक यांनी पत्त्यातील बदल नोंदणी प्राधिकाऱ्यास कळविणे बंधनकारक आहे. परंतु या वाहनाचे मालकांनी तसे कळविलेले नाही. त्यानुसार जप्त केलेल्या वाहनमालक, ताबेदार, वित्तदाते यांनी ही वाहने लिलावाच्या दिनाकांपर्यंत थकीत कर व दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन वाहने सोडवून घ्यावीत. किंवा लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास 5 नोव्हेंबर, 2019 पर्यंत लेखी हरकत घ्यावी. अन्यथा त्यांच्या वाहनांचा लिलाव करण्यात येईल असेही श्री. लोही यांनी कळविले आहे.
लिलाव करावयाच्या वाहनांची माहिती पुढील प्रमाणे
टॅक्सी क्रमांक एम.एच.19 वाय0340, ऑटोरिक्षा क्रमांक एम.एच.19 ऐ.क्यू 7032, एम.एच 19 क्यू 5704, एम.एच1 9 व्ही 2908, एम.एच.19 जे 8399, एम.एच.15 जे 7506, एम.एच. 15 बीजे 5014, एम.एच.19 व्ही1432, एम.एच.19 व्ही 0651, एम.एच.19 अेई5984, एम.एच.19 जे 6441, एम.एच19 जे 6426, एम.एच 19 व्ही 1828, एम.एच.19 अेई 2996, एम.एच.19 व्ही 2943, एम.एच.19 जे 8126, एम.एच.19 जे 8682, एम.एच.19 व्ही 6718, एम.एच 19 जे 6375 तसेच ऑटोरिक्षा मालवाहू वाहन क्रमाक एम.एच.19 एस 0881, एम.एच 19 जे 4826, तसेच टॅक्सी ओम्नी क्रमांक एम.एच. 19 वाय 1911 असे असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.