चाळीसगाव प्रतिनिधी । भारतीय बहुजन क्रांती दलाचे अध्यक्ष मोरसिंग राठोड हे चाळीसगाव मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढविणार असून पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
सध्या निवडणुकीचे वारे सुरू झाले असून विविध पक्ष आणि उमेदवार हे मोर्चेबांधणी करत आहेत. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात तर अनेक उमेदवारांनी आधीपासूनच कामाला प्रारंभ केला आहे. या अनुषंगाने भारतीय बहुजन क्रांती दलाचे अध्यक्ष तसेच मूळचे चाळीसगावकर असणारे सामाजिक कार्यकर्ते मोरसिंगभाई राठोड यांनी पत्रकार परिषदेत आपण निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, चाळीसगाव तालुक्यासाठी काही तरी नवीन करण्यासाठी आपण निवडणूक लढविणार आहोत. तालुक्यातील काही गावांमध्ये आपण रस्ते तयार केले असून याच प्रकारे भविष्यातही विविध कामे करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. तसेच विद्यार्थ्यांसाठी अॅप तयार करणार असल्याचे मोरसिंग राठोड म्हणाले.
पहा : मोरसिंग राठोड यांची निवडणूक लढविण्याबाबतची भूमिका.