चाळीसगाव, प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मोरसिंग राठोड यांनी आज (दि.३) आपला उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात प्रांत सातळकर यांच्याकडे सादर केला.
शेकडो समर्थकांसह त्यांनी आपली उमेदवारी नोंदवली असून यावेळी त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष युवराज संभाजी जाधव, युवा तालुकाध्यक्ष मधुर बागुल, नितीन मरसाळे, श्याम जाधव, आकाश जाधव, नदीम मन्सारी, हेमंत खैरे, पराग बागुल, विशाल मोरे, नरेंद्र पवार, हिरालाल राठोड, भरत चव्हाण, प्रकाश राठोड, संभाजी जाधव, संजय राठोड, गंगाराम राठोड, अहमद शेख व गोपाल भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.