रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सुमारे साडे चार हजारांपेक्षा जास्त शेतकर्यांचा पीक विमा कंपनीने रद्द केल्याने हलकल्लोळ उडाला असून शेतकरी मोठ्या प्रमाणात संतप्त झाले आहेत.
विमाकंपनीने शेतकर्यांना केळी पिक विमा रद्द केल्याने शेतकर्यांनी विमाकंपनीच्या कार्यालयात तक्रार देण्यासाठी गर्दी करत विमा कंपनी व लोकप्रतिनिधी यांच्या विषयी संताप करत तिव्र नाराजी व्याक्त केली. शेतकर्यांचा वाली कोणी नाही. प्रमाणिकपणे केळी पिक विमा काढला कंपनी कडे पैसे भरले संपूर्ण डाटा कंपनीने तपासून देखील काही कारण नसताना केळी पिक विमा रद्द केला. त्या बाबत लोकप्रतिनिधी कंपनी विरोधात कारवाई करीत नाही. विमा कंपनी मनमानी करीत आहेत कधीही शेतकर्यांचा छळ केला नाही एवढा छळ विमा कंपनी करीत असून देखील शासनाचा विमा कंपनीवर अंकुश राहिलेला नाही. शेतकर्यांना वार्यावर सोडले आहे शेतकर्यांचे कोणीही वाली राहिलेले नसल्याचे दिसत आहे. अशा शब्दात उपस्थित शेतकर् यांनी नाराजी व्याक्त केली.
दरम्यान, रद्द केलेल्या केळी पिक विम्याच्या कागापत्र देण्यासाठी रावेर तालुक्यातील शेतकर्यांनी विमाकंपनीच्या कार्यालयावर शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. रावेर तालुक्यात सुमारे ४ हजार ५५९ केळी पिक विमा भरलेल्या शेतकर्यांचे अर्ज विमा कंपनीने रद्द केलेले आहेत. विमा रद्द केलेल्या शेतकर्यानी आपआपल्या केळीचा विमा काढला असेल तर तसा अर्ज करून त्या सोबत संपूर्ण कागपत्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरु असून येथील शनिमंदीरा जवळील केळी पिक विमा कंपनीच्या कार्यालयात प्रतिनिधी उपस्थित होते. या अनुषंगाने रविवार असून सुद्धा आपआपली कागदपत्रे देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कंपनीने ४ हजार ५५९ शेतकर्यांचा केळी पिक विमा रद्द केलेला असून आता पर्यन्त एक हजार पाचशेच्या वर तक्रारी अर्ज येथील कंपनीच्या कार्याल्याकडे आलेले असून अजून १० दिवसतरी तक्रारी अर्ज स्विकारण्याची कार्यवाही सुरू राहणार असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगीतले.