भुसावळ (प्रतिनिधी) टेलिकॉमचा वेग चक्रावून टाकणारा आहे. शिवाय हा वेग प्रत्येक दशकात, किंबहुना प्रत्येकवर्षी वाढत चालला आहे. पूर्वी एखादा बदल होण्यास १० वर्षे लागत असतील तर तोच बदल आता एका वर्षांत होतो. स्मार्ट फोनसारखी सुविधा त्यांनी अतिशय कमी काळात आत्मसात केली आहे. जगात टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. या बदलांचा स्वीकार भारताने केला आहे. त्याचप्रमाणे टेलिकॉम क्षेत्राला लागणाऱ्या पायाभूत सुविधा येथे इतर देशांपेक्षा जास्त आहेत. म्हणूनच भारत हा टेलिकॉमच्या क्षेत्रात चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे, असे मत कम्युनिकेशन विषयाचे शिक्षक व प्रोसेसर तज्ञ प्रा. धीरज पाटील यांनी दि. १७ मे ‘जागतिक दूरसंचार दिनानिमित्त’ श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागात आयोजित ५ जी तंत्रज्ञानावावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेत व्यक्त केले.
त्यांनी फोन्समध्ये वापरल्या जाणाऱ्या ५ जी तंत्रज्ञानाचा एक भाग क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसरवर मार्गदर्शन केले तर नवीन तंत्रज्ञानामुळे होणारे बदल व फायदे प्रा. गजानन पाटील यांनी सांगितले.दोन सत्रात चाललेल्या या कार्यशाळेत महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागातील विभागप्रमुख डॉ. गिरीष कुळकर्णी, प्रा. अनंत भिडे, प्रा.धीरज अग्रवाल, प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.दीपक साकळे, प्रा.धीरज पाटील, नितीन पांगळे ह्या आठ तज्ञ प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.