आज सुध्दा बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त; १८३ पॉझिटीव्ह तर २०० झालेत बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज सलग दुसर्‍या दिवशी बाधीत रूग्णांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले आहे. आज १८३ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले असले तरी २०० जणांनी या विषाणूला हरविले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधीतांबाबत आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार आज जिल्ह्यात १८३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. यात सर्वाधीक ३९ रूग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल चोपडा-२५; पाचोरा-२०; धरणगाव-१३; जळगाव ग्रामीण-१२; पारोळा-१३ अशी रूग्ण संख्या आहे.

उर्वरित तालुक्यांमध्ये भुसावळ-६; अमळनेर-४; यावल-४; एरंडोल व जामनेर-प्रत्येकी ३; रावेर-२; चाळीसगाव-५; मुक्ताईनगर-८ आणि बोदवड-५ अशी रूग्णसंख्या आहे.

आजच्या आकडेवारीमुळे जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या ८१८७ इतकी झाली आहे. आजवर ५२५१ रूग्ण बरे झाले असून २५२१ वर उपचार सुरू आहेत. तर आजवर ४२१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

Protected Content