वरणगाव प्रतिनिधी । पंतप्रधान आवास योजनेचा लाभ वरणगावातील सिद्धेश्वर नगरातील नागरिकांना मिळावा, यासाठी आज माजी नगरसेविका माला मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव नगरपरिषदेवर महिला मोर्चा काढण्यात आला असून यासंदर्भातील मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन देण्यात आले.
वरणगावातील सिद्धेश्वर नगर येथे वीस ते तीस वर्षांपासून विविध जाती धर्माचे लोक राहत आहेत नवीन शासन नियमानुसार अतिक्रमणधारकांना त्यांच्या नावावर ती सदरची जागा शासनाने मोजमाप करून द्यावी व तिथे राहणाऱ्या गरजू व गरीब लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी माजी नगरसेविका मालाताई मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर ते दीडशे महिलांचा मोर्चा आज वरणगाव नगरपरिषदेवर काढण्यात आला होता यावेळी मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदनही देण्यात आले , यावेळी मुख्याधिकारी समीर शेख यांनी त्वरित कार्यवाही करून सिद्धेश्वर येथील रहिवाशांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी दिली आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/917411812319054