मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमुळे ३ ऑगस्टपासून सुरू होणार्या पावसाळी अधिवेशनाबाबत अनिश्चितता असून ते पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने ३ ऑगस्टपासून सुरू होणार्या पावसाळी अधिवेशनाबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. या महिन्याच्या अखेरीस संपणार्या लॉकडाऊनला केंद्र सरकार वाढवणार का ? अनलॉक करण्यासाठी अजून काय सवलती मिळणार ? या बाबी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. यामुळे पावसाळी अधिवेशन देखील शक्य नसल्याचे आज दिसून येत आहे. कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन आठवड्यात अधिवेशन गुंडाळावे लागले होते. तर पावसाळी अधिवेशनाची तारीख देखील पुढे ढकलले जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.