मोंदीनी द्वेषपूर्ण आणि असंसदीय भाषण देऊन पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवली – मनमोहन सिंह

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. अंतिम टप्प्यात पंजाबमध्ये मतदान होणार आहे. पंजाबमधील मतदानाआधी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी म्हटले की, काँग्रेसच एक चांगले भविष्य देऊ शकते. जेथे लोकशाही व संविधानाची सुरक्षा केली जाऊ शकते. मनमोहन सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या निशाणा साधताना म्हटले की, विशेष समुदाय किंवा विरोधकांवर टार्गेट करण्यासाठी ‘द्वेषपूर्ण आणि असंसदीय’ भाषण देऊन त्यांना पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. मनमोहन सिंह यांनी पंजाबच्या मतदारांना विकास आणि सर्वसमावेशन प्रगतीसाठी मतदान करण्याची तसेच प्रेम, शांती, बंधुभाव जपण्याचे आवाहन केले.

पंजाबच्या मतदारांना लिहिलेल्या एका पत्रात काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी लष्करावर अग्निवीर योजना थोपवली असल्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, भाजपला वाटते की, देशभक्ती, शौर्य आणि सेवेचे मुल्य केवळ चार वर्षे आहे. हा त्यांचा खोटा राष्ट्रवाद आहे. मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान मोदींच्या राजस्थान येथील रॅलीत केलेल्या भाषणावर टीका केली आहे. त्यात मोदींनी म्हटले होते की, जर काँग्रेस सत्तेत आली तर देशाची संपत्ती त्या लोकांमध्ये वाटली जाईल ज्यांना अधिक मुले आहेत.

पीएम मोदींनी दावा केला होता की, ‘मनमोहन सिंह यांनी आपल्या एका टिप्पणीत म्हटले होते की, देशातील संसाधनांवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे. पंजाबच्या लोकांना लिहिलेल्या पत्रात मनमोहन सिंह यांनी पीएम मोदी यांच्यावर ‘हेट स्पीच’ चा आरोप केला. पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोदींच्या आश्वासनावर निशाण साधताना मनमोहन सिंह यांनी म्हटले की, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे मागील १० वर्षात शेतकऱ्यांची कमाई जपळपास संपली आहे.

शेतकऱ्यांचे राष्ट्रीय सरासरी मासिक उत्पन्न केवळ २७ रुपये प्रतिदिन आहे, तर प्रति शेतकरी सरासरी कर्ज २७,००० रुपये (एनएसएसओ) आहे. इंधन आणि खतांच्या वाढत्या किंमती, कमीत कमी ३५ कृषि-संबंधित उपकरणांवर जीएसटी आणि कृषी निर्यात आणि आयातीच्या नितीत मनमानी पद्धतीने घेतलेल्या निर्णयाने शेतकऱ्यांची बचत संपली आहे.

मनमोहन सिंह यांनी म्हटले की, १० वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत खूपच उलटफेर पाहायला मिळाले. नोटबंदीची समस्या, जीएसटी आणि कोविड-१९ दरम्यान स्थिती हाताळण्यात अपयश आल्याने नाजूक स्थिती झाली होती. ६-७ टक्केहून कमी जीडीपी वृद्धीची अपेक्षा आता सामान्य झाली आहे. मनमोहन सिंह यांनी २०२०-२१ मधील शेतकरी आंदोलनावरही केंद्र सरकारवर टीका केली.

Protected Content